जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्यापेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे आशादायी चित्र आहे. मंगळवारी नव्याने एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही तर तीन जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात ४१,७१० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४१,०६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००
८ सक्रिय रुग्ण
मंगळवारच्या अहवालानुसार नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही. सध्या गृहविलगीकरणात ८ रुग्ण असून, सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.