प्रभाव लोकमतचालोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरामध्ये विकास कामे मोठया प्रमाणात सुरु असून संबधितांच्या दुर्लक्षामुळे या विकास कामांचा बट्टयाबोळ होत आहे. या संदर्भात लोकमतने २२ मे रोजी पासून ह्यविकासाचे भिजत घोंगडेह्ण वृत्तमालिका सुरु केली. पहिल्याच दिवशी प्रकाशित केलेल्या वृत्ताने खळबळ उडून सकाळीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होवून कामाची पाहणी केली. काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाल्याबरोबर सदर नाली तोडून पुन्हा बांधण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्यात. लोकमतने वृत्त प्रकाशित करताच नालीचे काम पुन्हा करणार असल्याचे नागरिकांना कळाल्यानंतर त्यांनी लोकमतचे आभार व्यक्त केलेत.वाशिम शहरात कोटयवधी रुपयांचे विकास कामे नगरपरिषदेच्यावतिने करण्यात येत आहेत. नगरपरिषदेने अनेक कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिले आहेत. सार्वजनिक बांधकामाने सदर कामाचे कंत्राट ठेकेदारांना दिले आहे. ठेकदार सुध्दा सुपरवायझरच्या भरवश्यावर कामे टाकून मोकळी झाली आहेत. कोणाचेच लक्ष नसल्याने कामात काय होत आहे याची कल्पना कोणालाच नसल्याने काय घडले यासंदर्भात लोकमतने वृत्तात सविस्त मांडणी केली होती. सकाळी सकाळी गाडयाघेवून अधिकारी समर्थ नगरात आल्यावर या भागातील नागरिकांनाही अचानक काय झाले कळेनासे झाले होते. परंतु अधिकाऱ्यांनी कामावर असलेल्या कंत्राटदार, ठेकेदारासह सर्व संबधितांना चांगलेच धारेवर धरलयने सदर प्रकार नागरिकांना कळाला. नाली बांधकाम तोडून पुन्हा करण्याचे सेूचना बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी दिलयने साहेब प्लास्टर करुन देतो म्हटल्याबरोबर बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता वाघमारे यांनी तेथे उपस्थित असलेल्यांना चांगलेच खडसावले.
निकृष्ट बांधकाम तोडण्याच्या सूचना
By admin | Published: May 22, 2017 7:23 PM