वाशिम : दुरसंचार विभागाच्या येथील उपपरिमंडळातंर्गत सेवांचा लाभ घेऊन दीर्घकाळापासून देयके थकविणार्या जवळपास ५00 जणांना दुरसंचार विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. दरम्यान, जे थकबाकीदार ग्राहक त्यांची थकीत रक्कम अदा करणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यासंदर्भातही दुरसंचार विभागाच्या दिल्ली स्थितीत कार्यालयातून निर्देश मिळाले असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने दिल्ली येथील सेंट्रल व्हीजीलन्स पथकाने (केंद्रीय दक्षता पथक) मुंबई येथील कार्यालयाच्या सहाय्याने हे याबाबतचे आदेश गेल्या दोन महिन्यापूर्वी निगर्मित केले होते. त्यानुषंगाने वाशिम उपपरिमंडळातंर्गत आतापर्यंत थकित देयके वसुलीसंदर्भात कोणती कार्यवाही झाली याची माहिती २२ जुलै रोजी जाणून घेतली असता ही बाब समोर आली. वाशिम तालुका व लगतचा ग्रामीण भागात उपविभागातंर्गत २६ लाख रुपयांची थकबाकी असल्याचे उप परिमंडळाचे अधिकारी बी. एस. अंभोरे यांनी सांगितले. ही थकबाकी वसूल करण्यासाठी ५00 थकबाकीदारांना नोटीसा बजावल्याचे ते म्हणाले. सोबतच दहा हजार मोबाईलेच स्टेटसही तपासण्यात आले असून २१00 सीमकार्ड अँक्टीव्हेट असल्याचे ते म्हणाले.
*लॅन्ड लाईनची संख्या घटती
वाशिम उपपरिमंडळातंर्गत सध्या दोन हजार ३00 लँन्ड लाईन कनेक्शन आहे. मात्र सध्या दुरसंचार क्षेत्रात वाढती स्पर्धा व अधुनिकीकरणामुळे मिळणार्या सुविधा पाहता लँन्ड लाईन कनेक्शन बंद करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे समोर येत आहे. १0 हजार मोबाईलचा स्टेटक चेक केल्यानंतर २१00 सिमकार्ड कार्यरत समोर आले.