वाशिम, दि. १४- गाव व तालुका पातळीवरील यंत्रणा अधिक सतर्क आणि सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष समिती व भरारी पथकाद्वारे या कार्यालयांना यापुढे आकस्मिक भेटी देण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत एकमुखाने पारित करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख तर व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर गोळे, पानुताई जाधव, यमुना जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद उपस्थित होते. सुरुवातीलाच ग्रामीण भागात कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत, काही कार्यालये दुपारनंतर कुलूपबंद राहतात, तालुकास्तरावरदेखील काही कार्यालयांमध्ये दुपारनंतर कुणीच उपस्थित राहत नाही. यामुळे ग्रामीण भागातील विकासात्मक कामांना खीळ बसत असून, लाभार्थींंंंंना अनेक वेळा चकरा मारण्याची वेळ येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावर गाव व तालुका पातळीवरील कार्यालयांना विशेष समिती व भरारी पथकाद्वारे आकस्मिक भेटी देण्याचा ठराव घेण्यात आला. प्रत्येक खाते प्रमुखाला महिन्यातून किमान दोन वेळा गाव व तालुका पातळीवरील कार्यालयांना भेटी देणे बंधनकारक करण्यात आले. या भेटीत दोषी आढळणार्यांविरोधात कारवाई केली जाईल, असाही ठराव पारित केला. जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी ढोणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागेचा मुद्दा उपस्थित केला. या शाळेचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन देऊनही अद्यापपर्यंंत प्रश्न 'जैसे थे' असल्याचे रोकडे यांनी सांगितले. सर्वसाधारण सभेत आश्वासन दिल्यानंतरही प्रश्न निकाली निघत नसतील, तर या सभेला ह्यअर्थह्ण काय, असा सवाल उपस्थित करून रोकडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मानोरा गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकार्यांना दिले. जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीमधील भौतिक असुविधांवर बोट ठेवून, सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, मुत्रीघर परिसरातील दुर्गंंंंंधी यासह अन्य असुविधा असून, सदर चित्र पालटण्यासाठी उपाययोजना करण्याचे सुचविले. जिल्हा परिषद सदस्य उस्मान गारवे यांनीदेखील विकासात्मक कामांबाबत प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. पशुसंवर्धन विभागांतर्गत पुरेसा औषधीसाठा खरेदी करण्याला या सभेने मंजुरात दिली. यासाठी कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी पुढाकार घेतला. सभेला पदाधिकार्यांसह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.पर्यवेक्षिकांकडे 'सीडीपीओ'चा प्रभार द्या !महिला व बालकल्याण विभागांतर्गत तालुकास्तर बालविकास प्रकल्प अधिकार्यांची (सीडीपीओ) बहुतांश पदे रिक्त आहेत. सदर पदांचा प्रभार विस्तार अधिकार्यांकडे सोपविण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार या पदाचा प्रभार आता अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे सोपविणे बंधनकारक आहे; मात्र वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही विस्तार अधिकार्यांकडेच या पदाचा प्रभार ठेवून शासकीय नियमांना तिलांजली दिल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य चक्रधर गोटे यांनी उपस्थित केला. एरव्ही नियमांवर बोट ठेवणार्या जबाबदार अधिकार्यांनी ह्यसीडीपीओंह्णसंदर्भाच्या शासकीय नियमाला का डावलले, असा सवाल गोटे यांनी उपस्थित केला. कडक शिस्तीचे म्हणून परिचित असलेल्या सीईओ गणेश पाटील यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी पदाच्या विद्यमान प्रभार्यांचा मुद्दाही गांभीर्याने घ्यावा, येथेही शासन निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा चक्रधर गोटे यांनी व्यक्त केली.
..आता कार्यालयांना आकस्मिक भेटी!
By admin | Published: October 15, 2016 2:43 AM