वाशिम : विविध शास्त्रीय कारणांसह आराेग्याच्या दृष्टीने आषाढात लग्नकार्ये केली जात नाहीत. परंतु सध्याच्या स्थितीत काहीही न पाळता या महिन्यातही लग्नकार्ये केली जात असल्याचे शहरातील मंगल कार्यालयातील बुकिंगवरून दिसून येते.
पूर्वी आषाढ महिन्यात लग्नकार्ये केली जात नसत. आता याला फाटा देत लग्नकार्ये पार पाडली जात आहेत. यासाठी अनेक शास्त्रीय कारणे असली, तरी आराेग्याच्या दृष्टीनेसुध्दा या महिन्यात लग्नकार्ये पार पाडली जात नाहीत. वाशिम शहरात जवळपास १० मंगल कार्यालये आहेत. या मंगल कार्यालयांमध्ये माेठया प्रमाणात नाही; परंतु ४ लग्न कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती मंगल कार्यालयाच्या संचालकांकडून प्राप्त झाली आहे. लग्नकार्य करणारे कुटुंब मंगल कार्यालयात येऊन बुकिंगची विचारणा करताना दिसून येत आहेत.
.....
आषाढात शुभ तारखा...
आषाढ महिन्यास २० जुलैपासून सुरुवात हाेत आहे. या महिन्यात सहसा लग्न काढण्यात येत नाही. तरीसुध्दा काही नागरिक विचारणा करतात. या महिन्यातील २२ व २९ तारखा शुभ आहेत.
......
परवानगी ५० चीच; पण...
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यापूर्वी ५० नागरिकांचीच परवानगी देण्यात आली आहे. यानंतर काेणतेच आदेश काढण्यात आले नसल्याने मंगल कार्यालय संचालक ५० चीच परवानगी गृहीत धरून आहेत. परंतु लग्न समारंभात यापेक्षा जास्त नागरिक दिसून येतात.
....
मंगल कार्यालये बुक
आषाढ महिन्यामध्ये लग्नाचे प्रमाण कमी असते. तरीसुध्दा शहरातील मंगल कार्यालयांमध्ये २२, २९ जुलै या तारखांचे बुकिंग दिसून येत आहे.
.....
आषाढ महिन्यात लग्न न करण्याची अनेक शास्त्रीय कारणे आहेत. ही कारणे जनतेस सांगितल्यास त्यावर ते विश्वास ठेवत नाहीत. तसेच सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आषाढ महिन्यात पावसामुळे राेगराईचे प्रमाण वाढते. यातून आजार उदभवू शकतात, त्यामुळे या महिन्यात लग्न करीत नाहीत. परंतु ज्यांची इच्छा आहे, त्यांना काय सांगावे.
- गिरधर महाराज कव्हळेकर,
वाशिम