शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आता सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:06 PM

मिसाळ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात संबंध महाराष्ट्रातील  शेतक-यांचे दु:ख सांगितले आहे. तरीही या सरकारला जाग येत नसेल तर  सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सरकारला दिला.

ठळक मुद्देमानोरा येथे पत्रकार परिषदसोयजना येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सांत्वन

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा (वाशिम): सोयजना येथील ज्ञानेश्वर मिसाळ या शेतक-याने  सरकारातील मंत्र्याला भेटुन, त्यांना सांगून आत्महत्या केली; मात्र मंत्र्यांनी त्यांची टिंगल टवाळी केली. त्यांना आत्महत्येपासून रोखले नाही किंवा त्यांना लढण्याचे बळ दिले नाही. त्यामुळे सरकारच्या त्या मंत्र्यांविरुध्द गुन्हे दाखल झाले पाहिजे. मिसाळ यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात संबंध महाराष्ट्रातील  शेतक-यांचे दु:ख सांगितले आहे. तरीही या सरकारला जाग येत नसेल तर  सरकारचा बंदोबस्त शेतकरीच करतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सरकारला दिला.

रविकांत तुपकर यांनी मानोरा तालुक्यातील सोयजना येथे रविवारी मृतक शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.त्यानंतर मानोरा येथील विश्राम भवनावर पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांच्या पाठीशी आहे. विदर्भात संघटनेच्यावतीने  मोठे आंदोलन उभारले जाईल. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात शेतक-यांना एकत्र केले जाईल व व्यवस्थेशी लढा देण्यात येईल. शेतक-यांनी मागच्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवुन भाजपाचे  सरकार सत्तेत आणले, मात्र  मागच्या पेक्षाही हे सरकार शेतक-यांच्या बाबतीत पुढे गेले. कोणताच न्याय दिला नाही. कर्जमाफी फसवी असून, शेतकºयांच्या बायकांचे अंगठ्यांचे ठसे घेतले. मात्र उद्योगपतींनी कर्ज काढले तेव्हा त्यांच्या बायका कुठे आॅनलाईन कर्जमाफीसाठी रांगेत दिसल्या नाही. हे सरकार उद्योगधार्जीने आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. बोंडअळीमुळे कपाशी संपली. मोसेस कंपनीवर साधी कारवाई झाली नाही. म्हणून सरकारने  या सर्व शेतकºयांना नुकसान भरपाई सरसकट दिली पाहिजे, देशातील  कर्नाटक राज्यात सोयाबीनला जास्त भाव आहे, राज्यात मो.का नाही,  महाराष्ट्र हा पाकीस्तानमध्ये आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सरकारला छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, आत्महत्याग्रस्त मिसाळ कुटूंबातील  एका मुलाला सरकारने नोकरी द्यावी, आत्महत्या करणाºया शेतक-यांना कुटूंबाला ५ लाख रुपये मदत द्यावी. सोयाबीन , कपाशी उत्पादक शेतक-यांना सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी त्यांनी केली. आता शेतक-यांनी आत्महत्या  करु नये, परिस्थिती तशी आली तर स्वाभीमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी राहिल. आता लढाई करुन मरा व राज्यकर्त्यांना हिसका दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, तालुका शिवसेना  प्रमुख रवि पवार, डॉ.विठ्ठलराव घाटगे,  शाम पवार, आकाश गाढव, स्वप्नील धनकर, डॉ.दिपक करसडे आदि उपस्थित होते. 

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरfarmer suicideशेतकरी आत्महत्याwashimवाशिम