लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी रुग्णसंख्येने चार हजाराचा टप्पा ओलांडला. दिवसभरात नव्याने ८२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे शनिवारी निष्पन्न झाले. आता एकूण रुग्णसंख्या ४०१७ वर पोहचली असून, यापैकी ७१९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. दरम्यान, वाशिम येथील ५० वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाल्याने मृतकाचा आकडा ८३ झाला आहे.सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये शनिवारी ८२ जणांची भर पडली. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १०, शिक्षक कॉलनी १, आययुडीपी कॉलनी येथील १, गणेशपेठ येथील २, सिंधी कॅम्प येथील १, लाखाळा परिसर १, शुक्रवार पेठ येथील २, जुनी नगरपरिषद परिसर २, करुणेश्वर मंदिर परिसर १, देवपेठ येथील २, विनायक नगर येथील १, माधवनगर येथील १, पोलीस वसाहत परिसर १, मोहजा रोड १, तामसी १, काजळंबा १, मालेगाव शहरातील ८, कवरदरी १, शिरपूर जैन २, घाटा १, जामखेड १, वाघळूद १, बोरगाव १, मंगरूळपीर शहरातील १०, पिंप्री अवगण ४, भडकुंभा १, मोहरी येथील १, रिसोड शहरातील २, गणेशपूर २, पिंप्री सरहद १, गोवर्धन येथील ३, करडा १, कारंजा लाड शहरातील बालाजी नगरी १, शिक्षक कॉलनी येथील १, हिवरा लाहे येथील ५, उंबर्डा बाजार येथील १, गिर्डा येथील अशा ८२ जणांचा मसावेश आहे.आता एकूण कोरोनाबाधित रुग्ण ४०१७ झाले असून, यापैकी ३११४ जणांनी कोरोनावर मात केली. आता ७१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यूसप्टेंबर महिन्यात कोरोनाबळींची संख्याही वाढत आहे. शनिवारी वाशिम येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत कोरोनामुळे ८३ जणांचे मृत्यू झाले असून, एका जणाने आत्महत्या केली आहे.