...............
वाशिम शहरात रस्त्यांवर गर्दी
वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९ मे पासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. ते १४ जूनपासून पूर्णतः शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे शहरातील रस्त्यांवर आता गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.
................
आवाहन करूनही नियमांचे उल्लंघन
वाशिम : कोरोनाचे संकट ओसरत असले तरी पूर्णतः निवाळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे ; मात्र नियमांचे दैनंदिन उल्लंघन करणे सुरूच आहे.
................
देयक अदा करा, कारवाई टाळा
वाशिम : जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा योजनांचे कोट्यवधी रुपयांचे विद्युत देयक थकीत आहे. ते विनाविलंब अदा करून कारवाई टाळा, असे आवाहन कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांनी केले.
...............
आर्थिक मदत देण्याची मागणी
वाशिम : जिल्ह्यात १९ ते २१ मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट होऊन शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले ; मात्र अद्याप मदत मिळाली नसून ती देण्यात यावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांमधून होत आहे.
.................
प्लास्टिक बंदी नियमाचा फज्जा
वाशिम : नियमात बसत नसलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. असे असताना प्लास्टिक बंदी नियमांचे फज्जा उडाल्याचे पाहावयास मिळत आहे.