वाशिम : गत दोन महिन्यांपासून मालेगाव शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका प्रशासनाने केले.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे आढळला होता. त्यानंतरही कुकसा फाटा येथे दोन, मुंबईवरून मालेगावला परत येत असताना शहरातील सहाजण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांपर्यंत शहरासह तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाचा आलेख घसरला. फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा आलेख उंचावला असून, सद्य:स्थितीत कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. मालेगाव शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.१६ एप्रिल रोजी तालुक्यातील धमधमी येथे तब्बल ७३ रुग्ण आढळून आले. शनिवारी रामनगर येथे २७ रुग्ण आढळून आले. १५ एप्रिल रोजी एकांबा येथे ३० रुग्ण आढळून आले. ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कायम असल्याने कोरोनाकाळातही नागरिक बिनधास्त असल्याचे दिसून येते. प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. शहरातील नागरिकांनीही बाजारपेठेत विनाकारण गर्दी करू नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हात वारंवार स्वच्छ धुवावेत, मास्क किंवा रुमालाचा वापर करावा, असे आवाहन तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
बॉक्स
गत चार दिवसांतील रुग्णसंख्या
१४ एप्रिल ३४
१५ एप्रिल ७७
१६ एप्रिल १०८
१७ एप्रिल ५०
००००
कोट
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. विनाकारण कुठेही गर्दी करू नये. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून आरोग्य विभागाला सहकार्य करावे.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक.
०००००