ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामांनिमित्त नागरिकांची वर्दळ असते. कोरोनाकाळातही जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत गर्दी होत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भीती वर्तविण्यात येत होती. दरम्यान, दहा दिवसांत जिल्हा परिषदेत जवळपास १४ ते १५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनामुळे एक साहाय्यक प्रशासन अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर, गुरुवार व शुक्रवारी आणखी जवळपास नऊ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. चार ते पाच विभागांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच विभागांत कोरोनाचा शिरकाव झाल्याने अधिकारी, कर्मचारी धास्तावल्याचे दिसून येते. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत प्रवेश करणाऱ्या तीनपैकी दोन प्रवेशद्वारे बंद करून एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवण्यात आले आहे. येथे दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, तपासणी करून आत प्रवेश देण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेत कोरोनाबाधितांचा आकडा १५ वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:36 AM