नंदकिशोर नारे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गंत गरजू रुग्णांना दृष्टी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या कार्यात जिल्हय़ात २00८ ते २२ ऑगस्ट २0१७ पर्यंत ६५७ नेत्रबुबळे जमा करून दृष्टिहीनांना दृष्टी देण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात आला आहे. दरवर्षी जमा करण्यात आलेल्या नेत्र बुबुळाचा विचार करता दिवसेंदिवस यामध्ये घट दिसून येत आहे. तसेच काहीसा प्रकार नेत्रदान कार्यातही दिसून येत आहे. जिल्हा शासकीय यंत्रणेमार्फत राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळावा, याकरिता शिबिरे, कांचबिंदू , मोतीबिंदू निदान व उपचार शिबिरे राबवून कार्यक्रमास काही वर्षांआधी गती देण्यात आली होती. २00९ पासून या कार्यास गती आली असताना या वर्षात मात्र जनजागृतीअभावी गती मंदावली असल्याचे नेत्र संकलन केंद्राच्या अहवालावरून दिसून येते. २00८ ते २0१७ या कालावधीत एकूण ३३२ नेत्रदात्यांनी रक्तदान केले, तर ६५७ नेत्र बुबुळे जमा करण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले. दरवर्षीची आकडेवारी पाहता यामध्ये दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. २00८ ते २00९ मध्ये ११ जणांचे नेत्रदान तर २२ नेत्र बुबुळे जमा करण्यात आली होती. २00९ ते १0 मध्ये ३२ जणांचे नेत्रदान व ६४ नेत्र बुबुळे, २0१0 ते ११ मध्ये ५५ जणांचे नेत्रदान तर १0८ नेत्र बुबुळे, २0११ ते १२ मध्ये ३४ जणांचे नेत्रदान तर ६६ नेत्र बुबुळे, २0१२ ते १३ मध्ये ३४ जणांचे नेत्रदान तर ६८ नेत्र बुबुळे, २0१३ ते १४ मध्ये ३४ जणांचे नेत्रदान तर ६७ नेत्र बुबुळे, २0१४ ते १५ मध्ये ४१ जणांचे नेत्रदान तर ८२ नेत्र बुबुळे, २0१५ ते १६ मध्ये ३0 जणांचे नेत्रदान तर ५९ नेत्र बुबुळे, २0१६ ते १७ मध्ये ४३ जणांचे नेत्रदान तर ८६ नेत्र बुबुळे, २0१७ ते २२ ऑगस्ट २0१७ पर्यंत १८ जणांचे नेत्रदान तर ३५ जणांचे नेत्र बुबुळे जमा करण्यात आरोग्य विभागाला यश प्राप्त झाले आहे. यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसून येत आहे. जिल्हय़ात नेत्रदान चळवळीला गतिमान करण्यासाठी नियंत्रक समिती अध्यक्ष जिल्हाधिकारी, कार्यकारी समिती अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्यचिकित्सक व त्यांची टीम प्रयत्नशील दिसून येत असली, तरी याला गती देणे आवश्यक झाले आहे. वाशिम जिल्हय़ात नेत्रदानाचे काम पूर्णत: शासकीय यंत्रणेमार्फतच राबविण्यात येते.
शासकीय नेत्रपेढीचा अभावअमरावती विभागात शासकीय यंत्रपेढीचा अभाव आहे. विभागातील अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलडाणा व अमरावती येथे शासकीय नेत्रपेढी नसल्याने विभागातील गरजूंना अडचणीचा सामना करावा लागतो. विभागात नेत्रपेढी झाल्यास सदर कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविल्या जाऊ शकतो.
नेत्रदानाबद्दल गैरसमज नेत्रदानामुळे मृत व्यक्तीच्या चेहर्यास विद्रुपता त्यांना पसंत नसते म्हणून नेत्रदान टाळतात; परंतु हा चुकीचा समज आहे.