वाशिम : कोरोना संदिग्ध रुग्णांवर उपचार आणि देखभालीसाठी तसेच अन्य रुग्णांच्या सेवेत विविध शासकीय, निमशासकीय आणि खाजगी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकांना शासनाकडून पुरेशा प्रमाणात संरक्षण किट मिळाली नाही. सर्व क्षेत्रातील परिचारिकांना आवश्यक ती संरक्षक किट पुरवावी तसेच कंत्राटी परिचारिकांना शासनसेवेत घ्यावे, या अशी मागणी नर्सेस असोसिएशन आॅफ महाराष्ट्र या संघटनेने ९ जूनला केली.देशासह महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होत असून, राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची भर पडत आहे. या कोरोनापिडीत रुग्णांवर उपचार आणि देखभालीसाठी डॉक्टर्ससह परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांना संरक्षक किट आहे. परंतू, संदिग्ध रुग्णांची तपासणी करणारे, परराज्य, परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम करणाºया परिचारिकांना त्या तुलनेत पुरेशा प्रमाणात संरक्षक किट नाहीत. खासगी रुग्णालयात सेवा देणाºया परिचारिकांनादेखील पीपीटी किट (‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट’) शासनाकडून मिळाली नाही. शासकीय, निमशासकीय, खासगी रुग्णालयात सेवा देणाºया परिचारिकांना पीपीटी किट (‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्वीपमेंट’) देण्यात यावी अशी मागणी नर्सेस संघटनेने केली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या व सेवा देण्याच्या कर्तव्यात डॉक्टरांप्रमाणेच कंत्राटी परिचारिकाही आघाडीवर आहेत. त्यांची ही सेवा लक्षात घेता यथावकाश या परिचारिकांना शासन सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
CoronaVirus : परिचारिकांकडे संरक्षक किटचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 4:12 PM