लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पोषण अभियान व्यापक प्रमाणात राबविले जात आहे. मात्र, यासंदर्भात तालुकास्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाकडे ‘आॅनलाईन रिपोर्टींग’ वेळोवेळी होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ‘आॅनलाईन नोंद’ होत नसल्याने तुर्तास या अभियानात जिल्हा माघारला असल्याचे दिसून येते.विविध स्वरुपातील आठ घटकांवर जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात १ ते ३० सप्टेंबर या दरम्यान पोषण अभियान राबविण्यात येत आहे. गरोदर महिलांची काळजी, प्रसूतीनंतर बालकाला तत्काळ व सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान, वयाची सहा महिने पूर्ण झालेल्या बालकास वरचा आहार, बालक, महिला व किशोरवयीन मुली यांच्यातील रक्ताल्पता, बालकांच्या वाढीचे सनियंत्रण, मुलींचे शिक्षण, पोषक आहार व विवाहाचे योग्य वय, वैयक्तिक स्वच्छता व परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सूक्ष्म पोषणमूल्य असलेल्या आहाराचे सेवन यासंदर्भात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जनजागृती करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात आहेत; मात्र तालुकास्तरावरून ‘आॅनलाईन रिपोर्टींग’ होत नसल्याने जिल्ह्याची प्रगती आॅनलाईन प्रक्रियेत कमी दिसत आहेत. ही बाब गांभीर्याने घेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी नियमित नोंद करण्याच्या स्पष्ट सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाºयांना दिल्या.
पोषण अभियान : तालुकास्तरावरून ‘आॅनलाईन रिपोर्टींग’च नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 5:56 PM
वाशिम : १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पोषण अभियान व्यापक प्रमाणात राबविले जात आहे. मात्र, यासंदर्भात तालुकास्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाकडे ‘आॅनलाईन रिपोर्टींग’ वेळोवेळी होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
ठळक मुद्दे जिल्ह्यात १ ते ३० सप्टेंबर या दरम्यान पोषण अभियान राबविण्यात येत आहे.‘आॅनलाईन रिपोर्टींग’ होत नसल्याने जिल्ह्याची प्रगती आॅनलाईन प्रक्रियेत कमी दिसत आहेत.