या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी मार्गदर्शन करताना अंगणवाडीसेविकांनी माता व बालकांचे उत्तम पोषण व्हावे म्हणून स्वत: जागरूक असणे गरजेचे असून, त्यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून पोषणविषयक नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेत समाजात याबद्दल प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले. मंगरूळपीरचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एस. एन. लुंगे यांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या तंत्रज्ञानातून प्रत्येक अंगणवाडीला शासनाकडून मिळालेल्या पोषण परसबाग किटचा वापर आपल्या गावात तंत्रशुद्ध सामाजिक पोषण परसबाग तयार करण्यासाठी करावा, असे सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एस. आर. बावस्कर यांनी केले.
--------
परसबागेने मुलांची निसर्गाशी जवळीक
ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान शाखेच्या प्रमुख शुभांगी वाटाणे यांनी पोषण परसबागेचे महत्त्व पटवून देताना अंगणवाडीत सामाजिक पोषण परसबाग तयार केल्यास मुलांची थेट निसर्गाशी जवळीक वाढते. सोबतच त्यांना सदृढ आरोग्यासाठी आहारातील भाज्या व फळे याचे महत्त्व पटवून देता येईल, तसेच त्यांनी बागेमध्ये थोड्या प्रमाणातही काम केल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल व चांगले पर्यावरण तयार होईल. असे पटवून देतानाच पोषण परसबागेचे प्रकार, नियोजन, पाणी, सेंद्रिय खत, कीड व्यवस्थापन, काढणी तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले.