या कार्यक्रमास मनभा ग्रामपंचायतीचे सरपंच वाहिद बेग मिर्झा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेतील कार्यक्रम सहायक शुभांगी वाटाणे यांनी परसबागेचे फायदे समजावून सांगितले. परसबागेतून ४५ दिवसांत उत्पादन सुरू होऊन वर्षभर एका कुटुंबाला दरदिवशी १ ते १.५ किलो वेगवेगळा आणि विषमुक्त भाजीपाला घराच्या दारात कोणत्याही क्षणी मिळू शकतो व जास्तीचा भाजीपाला विकून थोडे आर्थिक उत्पन्नही मिळू शकते. शिवाय, भाजीपाल्यावर होणारा किमान ५०० प्रतिमहिन्याचा सरासरी खर्च विचार करता वर्षभरात ६ हजार रुपयांची बचतही होते, असेही त्यांनी पटवून दिले. त्याचबरोबर परसबागेचा आराखडा व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान तयार केलेल्या पोषण परसबागेची पाहणी करून कृषी विज्ञान केंद्राकडून पोषणबाग किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास उमेद अभियानचे भूषण वानखेडे, प्रभक समन्वयक मनभा. आरती आघम तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष कारंजा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत ढगे, ग्रामसंग अध्यक्ष संगीता प्रशांत ढगे, ग्रामसंग सचिव सीमा नंदकिशोर ठाकरे, कृषी सखी अनसूया भीमराव ठाकरे, पशुसखी कोकिळा ढवक, वर्धनी प्रतिभा राजेंद्र भेलोंदे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
---------------------
आराखडा व व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन
मनभा येथे आयोजित कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान शाखेच्या कार्यक्रम सहायक शुभांगी वाटाणे यांनी उपस्थित महिलांना परसबागेचा आराखडा व व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान तयार केलेल्या पोषण परसबागेची पाहणी करून कृषी विज्ञान केंद्राकडून पोषणबाग किटचे वाटप करण्यात आले.
----------