महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद वाशिम पोषण आहार अभियान २०२१ अंतर्गत पौष्टिक आहार प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मनीषा नीळकंठ यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिता जाधव यांनी उपस्थित महिलांना पौष्टिक व संतुलित आहार, पहिले शंभर दिवस बाळाची घ्यावयाची काळजी, रक्ताशय, अतिसार मातेच्या आहाराबाबत व वैयक्तिक स्वच्छता इत्यादीबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले
--------
वृद्ध कलावंतांचे मानधन रखडले
कोठारी : परिसरातील वृद्ध कलावंतांनी मानधन मिळण्यासाठी सादर केलेले प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. याकडे लक्ष पुरवून प्रस्ताव निकाली काढावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी १६ सप्टेंबर रोजी समाजकल्याण विभागाकडे केली.
---------
वर्गखोल्यांसाठी निधी मिळेना
कोठारी : परिसरातील ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्या दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे निधीची मागणी नोंदविण्यात आली. अद्याप निधी मिळाला नसल्याने वर्गखोल्यांची दुरुस्ती रखडली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी सरपंचांनी गुरुवारी केली.
---------------
180921\img-20210917-wa0024.jpg
पोषण आहार प्रात्यक्षिक उद्घाटन