लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने बुधवारी मंगरूळपीर तालु क्यातील ११५ नागरिकांना उघड्यावर शौचास जाताना पकडले. या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होण्यासाठी गटविकास अधिकार्यांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनकडे सदर प्रकरण सोपविले आहे. तसेच काही नागरिकांना ‘ऊठबशा’ काढण्याची शिक्षा दिली.‘लढा स्वच्छतेचा, जागर हगणदरीमुक्तीचा’ या घोषवाक्याखाली ९ ऑगस्टपासून ‘संकल्प स्वच्छतेचा, स्वच्छ महाराष्ट्राचा’ अभियानाला सुरुवात झाली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत (ग्रामीण) स्वच्छतेचा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच उघड्यावरील ‘शौच’वारी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने जनजागृतीपर मोहीम हाती घे तली आहे. ‘लढा स्वच्छतेचा - जागर हगणदरीमुक्तीचा’ या घोषवा क्याखाली ‘संकल्प स्वच्छतेचा - स्वच्छ महाराष्ट्राचा’ या नावाने ९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छतेसंदर्भातील अभियान जिल्ह्यात राबविले जाणार आहे. शौचालय नसणार्या सर्व कुटुंबांना भेटी देऊन शौचालय बांधकामासाठी मानसिकता तयार करणे, शौचालय असून त्याचा वापर न करणार्या कुटुंबाना शौचालय वा परास प्रवृत्त करणे, विविध उपक्रमांद्वारे कुटुंब स्तरावर शौचालयाचे महत्त्व पटवून देणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. अभियानाच्या पहिल्याच दिवशी मंगरूळपीर तालुक्यातील ३0 पेक्षा जास्त गावांना भेटी देऊन जनजागृती केली. तसेच उघड्यावर शौचास जाणार्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. मंगरूळपीर तालुक्यात ११५ नागरिक उघड्यावर शौचास जाताना दिसून आले. काही जणांनी गुड मॉर्निंग पथकातील सदस्यांसोबत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मंगरूळपीर गटविकास अधिकार्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन संबंधि तांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम नंबर ११५ ते ११७ क, ख, ग नुसार दंड वसूल करावा, तसेच पुढील योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला. उघड्यावर शौचास जाणार्यांना पकडून ‘ऊठबशा’ काढण्याची प्राथमिक शिक्षा दिली व यापुढे उघड्यावर शौचास न जाण्याची शपथ घेतली. यापुढेही ही मोहीम तीव्र करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.
हगणदरीत जाणार्यांना ‘ऊठबशा’ची शिक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:49 AM
वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने बुधवारी मंगरूळपीर तालु क्यातील ११५ नागरिकांना उघड्यावर शौचास जाताना पकडले. या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होण्यासाठी गटविकास अधिकार्यांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनकडे सदर प्रकरण सोपविले आहे. तसेच काही नागरिकांना ‘ऊठबशा’ काढण्याची शिक्षा दिली.
ठळक मुद्दे‘गुड मॉर्निंग’ पथकाची ११५ नागरिकांवर कारवाई मोहीम तीव्र करण्याचा इशारा