शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

सुरू होण्यापूर्वीच ‘मेडिकल काॅलेज’च्या मार्गात अडथळा!

By संतोष वानखडे | Published: November 19, 2023 5:20 PM

जागा निश्चितीचा गुंता सुटेना : विलंबाचे कारणही कळेना

वाशिम : वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल काॅलेज) व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ जून रोजी मान्यता मिळाली. चार महिन्यांतही जागा निश्चिती झाली नसल्याने काम सुरू होण्यापूर्वीच मेडिकल काॅलेजच्या उभारणीत अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आले.जिल्ह्यात सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील गट क्रमांक २३८ मधील १५.३९ हे. आर,, गट क्रमांक २८२ मधील ८.९९ हे. आर. आणि गट क्रमांक २८४ मधील ६.५३ हे. आर. मिळून एकूण ३०.९१ हे. आर. (७७.०० एकर) ई-क्लास जमीन शासन निर्णयानुसार प्रस्तावित केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाहीदेखील केली. मात्र, त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा मुख्यालय परिसरात व्हावे या उद्देशातून जागेचे आणखी तीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. यामध्ये सावरगाव बर्डे, झाकलवाडी व वाशिम शहरानजीकच्या एका जागेचा समावेश आहे. यापैकी वाशिम शहरानजीकच्या एका जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. यासंदर्भात दोन महिन्यांतही शासनस्तरावर ठोस निर्णय झालेला नाही.

परिणामी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महसूलची जागा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास हस्तांतरीत होऊ शकली नाही. महसूलची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावे होण्यास एवढा विलंब कशासाठी? यामागचे कारणही जिल्हावासियांना कळेनासे झाले आहे.  जागा कोणतीही असो; पण जिल्ह्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अन्यत्र (परजिल्ह्यात) जावू नये, म्हणून लवकरात लवकर जागा निश्चिती व्हावी असा सूर जिल्हावासियांमधून उमटत आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीय