शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

शासकीय कामात अडथळा; वकिलावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 6:17 PM

Washim News : पोलिसांना उर्मट भाषेत बोलून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहरातील एका वकिलावर २२ मे रोजी गुन्हा दाखल केला.

वाशिम : पेट्रोलिंगदरम्यान मालेगाव शहरात कडक निर्बंधाच्या आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांना उर्मट भाषेत बोलून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहरातील एका वकिलावर २२ मे रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी वकिलाला विनाकारण अमानुष मारहाण केली आणि फिर्याद न घेतल्यावरून वकील संघाने रविवारी न्यायालयासमोर एकत्र जमून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सरदारसिंग सोनोने यांनी फिर्याद दिली की, २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान पोलीस अधीक्षक हे मालेगाव येथे आले असता, यादरम्यान पेट्रोलिंग करीत असताना समोरून येणाºया एम.एच. ३७ व्ही २१२३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला थांबविले. कडक निर्बंध व संचारबंदी लागू असल्याचे सांगुन बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता, अ‍ॅड. सुदर्शन गायकवाड यांनी अंत्यत उर्मट भाषेत उत्तर दिले. कायदेशीर कारवाई करताना शासकीय अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भादंवी कलम ३५३, ३३२, १८६, २९४, ५०४, १८८, २६९, २७०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. वकिल संघाकडून निषेध

पोलिसांनीच वकिलाला विनाकारण मारहाण केल्याचा उल्लेख करीत वकील संघ व तालुका बार असोसिएशनने या घटनेचा निषेध केला. वकिल संघाने घेतलेल्या ठरावात नमूद केले की, अ‍ॅड. सुदर्शन गायकवाड हे शेतातून येत असताना पोलिसांच्या ताफ्याला ओव्हरटेक का केले म्हणून वाहन पोलीस स्टेशनला लावण्यास सांगितले. यावेळी पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला दवाखान्यात न्यायचे आहे, असे सांगितले. याची शहानिशा म्हणून अ‍ॅड. गायकवाड यांच्यासोबत एक कमांडो घरी पाठविला. यावेळी कमांडोने बाचाबाची केली तसेच अन्य पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठून शिवीगाळ व मारहाण केली, असे वकिल संघाने घेतलेल्या ठरावात नमूद केले. यावर अ‍ॅड. महेश शेलकर, अ‍ॅड. एस जे सोमाणी, अ‍ॅड. एस. एन. मगर, अ‍ॅड. अग्रवाल, अ‍ॅड. पुरोहित, अ‍ॅड. पवन गट्टानी, अ‍ॅड. विजय बळी, अ‍ॅड. ज्ञानेश्वर कराळे, अ‍ॅड. दिनेश शर्मा, अ‍ॅड. कैलाश चतरकर, अ‍ॅड. के अन सोळंके, अ‍ॅड. बी के साठे यांच्यासह जिल्ह्यातील वकिलांच्या सह्या आहेत.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी