लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आषाढी एकादशीनिमित्त वाशिम जिल्ह्यात २३ जुलै रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले.‘विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल’चा जयघोष, टाळमृदंग विणेचा नाद करीत विठ्ठल नामाचा गजर झाला. वाशिम शहरातील सर्व विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी आपल्या लाडक्या विठूरायाच्या चरणी माथा टेकविला. शुक्रवार पेठ, विठ्ठल मंदिर व देवपेठ मधील विठ्ठल मंदिरासह, आयुडीपी, लोटांगण महाराज संस्थान, शहरातील विविध भागातील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटेपासून अभिषेक, महाआरती, पूजन, भजन किर्तन, हरिपाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रम व उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात पार पडले. शहरातील शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रूख्मिनींच्या वेशभूषा साकारल्या. रिसोड येथे श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. करण्यात आले आहे. हरिपाठ, अभिषेक, हवन पठण, फराळाचे वितरण करण्यात आले. संत गजानन महाराज मंदिर परिसरातील विठ्ठल रुख्मिनी मंदिरात दर्शनाकरिता भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता अगोदरच शिस्तबध्द नियोजन केले होते. मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, शिरपूर, शेलुबाजार, अनसिंग यासह प्रमुख गावांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.
आषाढी एकादशीनिमित्त वाशिम जिल्ह्यात विविध कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:50 PM
वाशिम : आषाढी एकादशीनिमित्त वाशिम जिल्ह्यात २३ जुलै रोजी विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले.
ठळक मुद्दे‘विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल’चा जयघोष, टाळमृदंग विणेचा नाद करीत विठ्ठल नामाचा गजर झाला. वाशिम शहरातील सर्व विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांनी आपल्या लाडक्या विठूरायाच्या चरणी माथा टेकविला. शहरातील शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रूख्मिनींच्या वेशभूषा साकारल्या.