----------------
तलाठ्यांची ६ पदे रिक्त
वाशिम : तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांत शेतकरी, ग्रामस्थांना विविध प्रकारचे दाखल देण्यासाठी तलाठ्यांची उणीव भासत आहे. तालुक्यात तलाठ्यांची सहा पदे रिक्त असल्याने शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना अडचणी येत आहेत.
----------------
पशुचिकित्सालय इमारतींची दुरवस्था
वाशिम : पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हाभरातील ८ ठिकाणच्या पशुचिकित्सालय इमारतींची अवस्था वाईट आहे. त्यामुळे पशुपालकांसह कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना पशूंवर उपचार करण्यासह इतर कामकाज करताना अडचणी येत आहेत.
----------------
भूमी अभिलेख कार्यालयात गर्दी
वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जमीन मोजणीसह खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी व इतर नागरिक नोंदणी व दस्तऐवजासाठी भूमी अभिलेख कार्यालयात धाव घेत असल्याने याठिकाणी गर्दी होत असल्याचे गुरुवारी दिसले.
--------------------
बाजार समितीत निर्जंतुकीकरण
वाशिम : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत शेतमाल घेऊन येणारे शेतकरी व इतरांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. यासाठी गुरुवारी वाशिम बाजार समितीत संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले.
--------------------
एकबुर्जी प्रकल्पात ४२ टक्के साठा
वाशिम : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी घट येत आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात ४२ टक्के उपयुक्त साठा असला तरी सिंचनासाठी उपसा होत असल्याने पुढे पातळी खालावून पाणीपुरवठा प्रभावित होण्याचा धोका संभवतो.