वाशिम : येथील जिल्हा क्रीडा संकुलावर आयोजित जिल्हा कृषी महोत्सवास अधिकारी, पदाधिकाºयांनीच पाठ फिरविल्याचे २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या उदघाटनावरुन दिसून आले. योग्य नियोजनाअभावी सकाळी ११ वाजता नियोजित असलेले उदघाटन तब्बल ७.३० तास उशिरा संध्याकाळी ६.३० वाजता करण्यात आले.प्रकल्पसंचालक आत्मा अंतर्गंत जिल्हयात मोठा गाजावाजा करीत २१ फेब्रुवारीपासून २५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री संजय राठोड तर अध्यक्ष म्हणून गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील होते. तर प्रमुख अतिथीमध्ये राज्यमंत्री मदन येरावार, खासदार संजय धोत्रे, विधानपरिषद सदस्य श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदाताई देशमुख, खासदार भावनाताई गवळी, विधान परिषद सदस्य गोपिकीशन बाजोरीया, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना, विभागीय कृषी सहसंचालक एस.के. नागरे, कृषी सभापती विश्वनाथ सानप होते. यापैकी केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदाताई देशमुख, जिल्हाधिकारी मोडक व कार्यक्रमाचे विनीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसान ेयांचीच केवळ उपस्थिती लाभली होती. डझनभर पाहुण्यांना आमंत्रित करुनही नेहमी शेतकºयांप्रती सहानुभूती दर्शविणाºया महत्वाच्या अधिकारी व पदाधिकाºयाने हजेरी लावली नाही. याबाबत शेतकºयांमध्ये उलट-सुलट चर्चा होतांना दिसून येत आहे. एक पदाधिकारी व दोन अधिकारी उपस्थितउदघाटन कार्यक्रमासाठी डझनभर पदाधिकाºयांची उपस्थिती राहणार असल्याची पत्रिका प्रकाशित करण्यात आली त्यामधील केवळ एक पदाधिकारी उपस्थित राहू शकले तर चार प्रमुख अतिथी असलेल्या अधिकाºयापैकी केवळ एक अधिकारी उपस्थित राहलेत. जे एकमेव अधिकारी उपस्थित होते तेच त्या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा होते हे विशेष! प्रगतशिल शेतकºयांना केले प्रमुख मान्यवरकृषी महोत्सवास प्रमुख मान्यवरांची अनुपस्थिती पाहता वेळेवर महोत्सवात आलेल्या प्र्रगतशील शेतकरी गरदडे, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त दिलीप फुके यांनाच प्रमुख मान्यवर करुन मंचावर बसविण्यात आले. कृषी सभापतींचीही अनुपस्थितीजिल्हा परिषद कृषी सभापती विश्वनाथ सानप यांचीही यावेळी अनुपस्थिती दिसून आली. परंतु त्यांच्या आईची प्रकृती अस्वस्थ असल्याने ते हजर राहू शकले नसल्याची माहिती आहे. कारण हा कार्यक्रम व्हावा यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला होता.
अधिकारी, पदाधिकाऱ्यांनीच फिरविली कृषी महोत्सवाकडे पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:09 PM