शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दावेदारांना प्रतिक्षा अधिकृत घोषणेची; इच्छुकांना वर्णीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 1:54 PM

भाजप-सेना युतीचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची अद्याप घोषणाच केली नाही.

- दादाराव गायकवाड  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि निवडणूक कार्यक्रमही निवडणूक आयोगाने जाहिर केला. तथापि, भाजप-सेना युतीचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची अद्याप घोषणाच केली नाही. त्यामुळे संभाव्य दावेदारांना अधिकृत घोषणेची, इच्छुकांनाही तिकिटासाठी वर्णी लागण्याची प्रतीक्षा लागली असल्याचे चित्र कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघात पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजकीय पक्षांनी अधिकृत घोषणा केली नसली तरी, संभाव्य दावेदार आणि इच्छुकांनी नेत्यांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत.गतवेळच्या निवडणुकीत कारंजा-मानोरा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेेंद्र पाटणी यांनी ऐन निवडणूकपूर्वी भाजपात प्रवेश करून विजय मिळविला. त्यावेळी सेना, भाजपाची युती न झाल्याने त्यांना भाजपाच्या अधिकृत तिकिटावर निवडणूक लढविता आली, तर सेनेलाही आपला अधिकृत उमेदवार उभा करता आला; परंतु आता लोकसभेत युती करणाऱ्या भाजपा-सेनेत विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपाचा मुद्दा कळीचा ठरत आहे. त्यामुळे युतीचा निर्णय रखडला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही गतवेळची निवडणूक स्वतंत्र लढविली होती; परंतु आता या दोन्ही पक्षाची पुन्हा आघाडी होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीत कारंजा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. निर्णयाअभावी उमेदवाराची घोषणा मात्र रखडली आहे. दुसरीकडे भाजपा-सेना युती झाली, तर पूर्वी सेनेकडे असलेला कारंजा मतदारसंघ भाजपा सोडणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सेना हा मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याचे किंबहुना या मतदारसंघावर सेनेने दावा केल्याचे दिसत असून, अशाच काही मतदारसंघांमुळे युतीचा निर्णय अधांतरी आहे. या निर्णयाअभावी दोन्ही पक्षांच्या दावेदारांचा जीव टांगणीला लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अपेक्षीत असली तरी, उमेदवारांची घोषणा रखडल्याने या पक्षातील दावेदारांनाही ती प्रतिक्षा लागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे चित्र यापेक्षाही वेगळे आहे. ऐन विधानसभा निवडणूकीपूर्वी वाटाघाटीसह इतर मुद्यांवरून भारीप-बमसं आणि एमआयएमचे फिस्कटले. त्यात गतवेळच्या निवडणुकीत दुसºया क्रमांकाची मते घेणाºया भारीपकडून अर्थात वंचित बहुजन आघाडीकडून लढण्याची इच्छा अनेकजण बाळगून आहेत. तथापि, अद्याप एमआयएम आणि भारीप या दोन्ही पक्षाच्या काडीमोडाची अधिकृत घोषणा झालेली नसून, पक्ष सोबत असले तरी, त्यांनीही कारंजासाठी उमेदवाराची घोषणा केली नाही. त्यामुळे वचिंतकडून विधानसभा लढविण्यास इच्छूक असलेल्यांची घालमेल सुरू असून, सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपापल्या स्तरावर गाठीभेटी वाढविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

तयारी सेना आणि भाजपाचीहीविधानसभा निवडणुकीत सेना-भाजपा युती होणार की नाही, हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कारंजात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. तथापि, २०१४ पूर्वीच्या वाटाघाटीनुसार सेना या मतदारसंघावर आग्रही असल्याने सेनेच्या इच्छुकांची तयारी जोरात आहे. सद्य:स्थितीत भाजपाकडे हा मतदार संघ असल्याने भाजपाकडूनही निवडणुकीची तयारी जोरातच आहे.

 

टॅग्स :washimवाशिमkaranja-acकरंजाPoliticsराजकारण