राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील ५० वर्षांवरील वृद्ध कलावंताना दर महिन्याला अ, ब, क श्रेणीनुसार मानधनाचे वाटप करण्यात येते. सध्या स्थितीत राज्यात सुमारे २८ हजार वृद्ध कलावंत मानधनाच्या कक्षेत येतात. मानधनापोटी दर महिन्याला ७ कोटी रुपयांचे वाटप केले जाते. वृद्ध कलावंताची निवड करण्याची जबाबदारी या समितीची असते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या रचनेप्रमाणे मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता, उर्वरित ३४ जिल्ह्यांत ही समिती गठित करण्याची जबाबदारी ही संबधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे असते. मात्र, हे नवे आघाडी सरकार आल्यापासून सुमारे १४ जिल्ह्यांत ही समिती गठीत करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित आहेत. याकडे संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
दोन वर्षांपासून वृद्ध कलावंत मानधन समिती नेमली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:42 AM