वाशिम, दि. २३- जिल्ह्यातील नागरिकांना कमी कालावधीत जुन्या अभिलेखांच्या प्रती उपलब्ध व्हाव्यात, याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात 'एनी टाइम डॉक्युमेंट्स मशीन' (एटीडीएम) कार्यान्वित करण्यात आले आहे. 'एटीएम'प्रमाणेच कार्यपद्धती असलेल्या या यंत्रातून सात-बारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल, पेरेपत्रक आदी पाच प्रकारच्या अभिलेखांच्या प्रती मिळविता येणार आहेत.जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील नागरिकांचे सात-बारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी अभिलेख 'एटीडीएम मशीन'द्वारे मिळविता येतील. हक्क नोंदणी रजिस्टर, पेरेपत्रक व सात-बाराची प्रत मिळविण्याकरिता गट नंबर किंवा सर्व्हे नंबर माहीत असणे आवश्यक आहे. त्याधारे आपल्याला आवश्यक सात-बारा शोधून त्याची प्रिंट घेता येईल. त्याचप्रमाणे गट नंबर, सर्व्हे नंबर किंवा फेरफार क्रमांक टाकून फेरफार अभिलेखाची प्रत मिळविता येणे आता शक्य झाले आहे, तसेच संबंधित वर्षाच्या माहितीद्वारे कोतवाल बुक नक्कल मिळविता येईल. अभिलेखाची एक प्रत मिळविण्यासाठी मशीनमध्ये केवळ २0 रुपये रोख स्वरूपात जमा करावे लागतील. एका प्रतीस २0 रुपये याप्रमाणे अभिलेखांच्या कितीही प्रती एका वेळेस काढता येतील.जिल्ह्यातील नागरिकांना अभिलेखांच्या प्रती सहज व कमी कालावधीत उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या कल्पनेतून ह्यएटीडीएम मशीनह्ण कार्यान्वित झाले असून, त्यात सुमारे ४३ लाख अभिलेख अपलोड करण्यात आले आहेत. यामुळे नागरिक व प्रशासनाच्या वेळेतही बचत होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले. या यंत्राचा वापर करणे अत्यंत सोपे असून, संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
जुने अभिलेख मिळणार आता एका ‘क्लिक’वर!
By admin | Published: February 24, 2017 2:01 AM