वाशिम : यवतमाळ-वाशिम लाेकसभा मतदार संघाच्या निवडणुक मतदानास २६ एप्रिल राेजी सकाळी ७ वाजतापासून सुरुवात झाली. सकाळी ७ वाजतापासूनच वाशिम शहरातील मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. या दरम्यान वाशिम शहरातील रस्त्यांवर नगरपरिषदेच्यावतीने शहरात चालणाऱ्या सर्व घंटागाड्यांवर भाेंगा लावून ‘मतदान करा, मतदान करा’ यासह विविध घाेषणा देत गावातून फेरफटका मारला.
twitter.com
वाशिम शहरातून या घंटागाडया एका रांगेत जात असल्याने अनेकांचे लक्ष वेधले हाेते. मुख्याधिकारी नीलेश गायकवाड, बांधकाम अभियंता अशाेक अग्रवाल, कार्यालयीन अधीक्षक राहुल मारकड, स्वच्छता निरीक्षक जितू बढेल यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात घंटागाड्यांची रॅली काढण्यात आली हाेती. तसेच वाशिम नगरपरिषदेच्यावतीने शहरातील ४ मतदान केंद्रांची सजावट करण्यात आली हाेती. या सजावटीचेही नागरिकांनी काैतूक केले.