पैनगंगेच्या तिरावर... राहुल गांधीं विदर्भात दाखल, वाशिममध्ये हजारो नागरिक पदयात्रेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 07:35 AM2022-11-15T07:35:54+5:302022-11-15T07:57:51+5:30
राहुल गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो नागरिक पदयात्रेत दाखल झाले होते.
वाशिम : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्हा सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर विदर्भात दाखल झाली. यावेळी भारत जोडोच्या घोषणा देण्यात आल्यात . राहुल गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो नागरिक पदयात्रेत दाखल झाले होते.
कनेरगाव नाका (जि. हिंगोली) ते राजगाव (ता.जि. वाशिम) या दरम्यान असलेल्या पैनगंगा नदी पूलाजवळ वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर उभारलेल्या भव्य स्वागतव्दारात मोठ्या थाटात पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. हिंगोली-वाशिम जिल्हा सिमेवर असलेल्या राजगाव गावानजीक पैनगंगा नदी पुलाजवळ लालकिल्ल्याच्या प्रतिकृतीत भव्य स्वागतद्वार उभारणी वाशिम येथील कलाकारांनी केली . यावेळी पहाटे ६ वाजतापासून नागरिकांनी गर्दी केली होती . यावेळी देशभक्तीपर गिताने वातावरण भारावून टाकले होते . यावेळी अमरावती येथील रामराज्य ढोलताशा ध्वजपथकाने ढोल वाजवून राहुल गांधी यांचे स्वागत केले.