--------------
काळविटाच्या पिलास जीवदान
वाशिम : जमकेश्वर येथे एका शेतकऱ्याच्या शेतात रविवारी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळविटाच्या पिलास निसर्ग स्पर्श फाउंडेशनच्या सदस्यांनी उपचार करून वनविभागाच्या स्वाधीन करीत त्याला जीवदान दिले.
--------------
इंझोरीत ग्रामस्थांची तपासणी
इंझोरी : मानोरा तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता आरोग्य विभागाने ग्रामस्थांची तपासणी सुरू केली आहे. त्यात इंझोरी येथे रविवारी घरोघरी फिरून ग्रामस्थांची तपासणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली.
-----------------
समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत माहितीचे संकलन
वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी ४१ गावांतील गावकरी रात्रंदिवस गाव समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यात लहान, थोर मंडळींचा सहभाग दिसत असून, मंगरूळ्पीर तालुक्यातील पिंप्री खु. येथील ज्येष्ठ नागरिक के. एन. सुर्वे, गोविंद सुर्वे, चेतन सुर्वे, अमोल सुर्वे, गोपाल सुर्वे व इतर जलमित्र मेहनत घेत आहेत.