लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - केरळमध्ये पावसाने कहर केला असून, आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. वाशिम जिल्हा परिषदेनेदेखील पुढाकार घेत अधिकारी, कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे.देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाºया केरळमध्ये पावसाने कहर केला असून, जवळपास १९ हजार कोटींपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामध्ये प्राणहानी व वित्तहानी झाली असून, नैसर्गिक आपत्तीच्या या कठीण प्रसंगी केंद्र, राज्य सरकारप्रमाणेच अनेकजण अर्थसहाय्य करीत आहेत. ही सामाजिक जबाबदारी ओळखून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी स्वत:सह जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यासंदर्भात चर्चा केली. केरळमधील आपतग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तसेच शिबिरामध्ये लोकांना पिण्याचे पाणी, अन्न व कपडे पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाºयांनी अर्थसहाय्यासाठी होकार देताच, आॅगस्ट महिन्यातील एका दिवसाचे वेतन कपात करून आपत्तीग्रस्तांसाठी दिले जाणार आहे. केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडात सदर अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. वेतनाची ही कपात आयकर अधिनियम १९६१ कलम ८० जी नुसार १०० टक्के आयकर सुटीस पात्र राहणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी सांगितले.
केरळमधील आपत्तीग्रस्तांसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 2:01 PM
वाशिम - केरळमध्ये पावसाने कहर केला असून, आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. वाशिम जिल्हा परिषदेनेदेखील पुढाकार घेत अधिकारी, कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे.
ठळक मुद्देशिबिरामध्ये लोकांना पिण्याचे पाणी, अन्न व कपडे पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे.अधिकारी, कर्मचाºयांनी अर्थसहाय्यासाठी होकार देताच, आॅगस्ट महिन्यातील एका दिवसाचे वेतन कपात करून आपत्तीग्रस्तांसाठी दिले जाणार आहे.