लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात आतापर्यंत दोन जणांचा कोरोनामुळे बळी गेला. अशातच महाराष्ट्रात कोरोना मृत्यूचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी केला होता, त्याच्या पृष्टर्थ त्यांनी सरकारचा हवाला देत बुधवारी एक टिष्ट्वट केले. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात एका मृत्यूची माहिती लपविण्यात आल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणविस यांनी केला होता. या आरोपाने राज्याची आरोग्य यंत्रणाचा अडचणीत आली होती. दरम्यान शासनानेच कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची सुधारीत यादी प्रसिद्ध केल्यावर त्यामध्ये वाढलेला मृतकांचा आकडा हा लपविलेला होता असा दावा करीत फडणवीस यांनी पुन्हा नवी आकडेवारी टिष्ट्वट केल्याने सध्या आकडयांचा खेळ रंगला आहे.जागतिक आरोग्य संघटना आणि आयसीएमआर यांच्या मार्गदर्शनानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मृत्यूची समीक्षा करणाऱ्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला जिल्हा स्तरावर रुग्णाच्या मृत्यूचे आॅडिट सात दिवसांच्या आत करणे अनिवार्य आहे. त्यामध्ये रुग्णाच्या मृत्यूच्या कारणांचा सविस्तर शोध घेणे, रुग्णांच्या मृत्यूचे तत्कालिन कारण कोविड-१९ नसल्यास तसे नमूद करणे आवश्यक आहे. अशा रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे गृहित धरण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने फेरतपासणीच्या नावाखाली आकड्यांमध्ये बदल केल्याचा आरोपही त्यांनी या टिष्ट्वटच्या माध्यमातून केला. सरकारचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या या यादीमध्ये वाशिम जिल्ह्यातील १ मृत्यू लपविण्यात आल्याचे सांगितले आहे. या माहितीमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे दोन मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये मुंबई येथून नागपूरकडे जाणाºया ट्रकचा क्लिनर तसेच मुंबई येथून मालेगावला परतत असताना कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील मालेगाव येथील एका इसमाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अन्य कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. कवठळ ता. मंगरूळपीर येथील रुग्ण हा वर्धा जिल्ह्यातच कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने आणि त्याचा मृत्यू वर्धा येथेच झाल्याने त्याची नोंद वाशिम येथे करण्यात आली नाही.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम
वाशिममध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची लपवाछपवी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:59 AM