- ओम वलोकार लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : विविध स्वरूपातील अडचणींमुळे पारंपरिक पिकांपासून तुलनेने अपेक्षित उत्पन्न मिळणे अशक्य झाले आहे. यासह उत्पन्नातही घट होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कोठारी परिसरातील शेतकऱ्यांनी पर्यायी पिक म्हणून बिजवाई कांद्याचा आधार घेतला असून सुयोग्य नियोजनातून तो यंदा चांगलाच बहरल्याचे दिसून येत आहे.कोठारी येथील प्रगतीशिल शेतकरी विठ्ठल पवार हे आपल्या शेतात गत ४ वर्षांपासून बिजवाई कांद्याची लागवड करित आहेत. तुरीचे पीक निघाल्यानंतर साधारणत: डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बिजवाई कांदा बेण्यांची लागवड केली जाते; मात्र यंदा उशिरा झालेल्या पेरणीमुळे तूरीचे पिक लवकर काढणे शक्य झाले नाही. त्यावर पर्याय म्हणून शेतकरी विठ्ठल पवार यांनी मुरमाड, खडकाळ जमिनीवर कांदा बेण्याची लागवड केली. उच्च दर्जाचे बियाणे, खत, पाण्याचे योग्य नियोजन करून वेळोवेळी परिश्रम घेतल्यामुळेच सद्या त्यांच्या शेतातील बिजवाई कांदा चांगला बहरल्याचे दिसून येत आहे.कंपनीसोबत ४० हजार प्रतिक्विंटलने विक्रीचा करारकोठारी येथील शेतकरी विठ्ठल पवार यांनी ६ हजार रुपये प्रतिक्विंटलने एका ठराविक कंपनीकडून २० क्विंटल कांदा बेणे विकत घेतले. त्याच कंपनीला ४० हजार रुपये प्रतिक्विंटल दराने उत्पादित होणारे कांदा बियाणे विक्री करण्याचा करार त्यांनी केलेला आहे. एकरी सहा ते सात क्विंटल उत्पन्न होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नियोजनातून बहरला बीजोत्पादनाचा कांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 12:35 PM