प्रशासनाने जिल्हाभरातील ग्रामपंचायतींना ऑनलाईन ग्रामसभा घेण्याच्या सूचना दिल्या होता. त्यानुसार विविध ग्रामपंचायतीत ऑनलाईन ग्रामसभा घेणे सुरू आहे. शिरपूर ग्रामपंचायतने ही ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन केले होते. यासाठी मोठी जनजागृती सुद्धा करण्यात आली. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी आयोजित ग्रामसभेसाठी गावकऱ्यांना एसएमएस, व्हाॅट्सॲप, फेसबुकद्वारे लिंक पाठविण्यात आली होती. मात्र तरीसुद्धा ऑनलाईन ग्रामसभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे ऑनलाईन ग्रामसभा तहकूब करावी लागली. प्रत्यक्षात नेटवर्क व्यवस्थित नसणे, प्रशासनाकडून पाठवलेली लिंक नागरिकांना ओपन न करता येणे आदी बाबी ग्रामसभा तहकूब होण्यास कारणीभूत ठरल्या.
०००००००००००००००००
कोट: शिरपूर येथील ऑनलाईन ग्रामसभेला किमान शंभर नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे होते. मात्र अठरा ते वीस ग्रामस्थांना या सभेत सहभागी होता आहे. परिणामी सभा तहकूब करावी लागली. तहकूब केलेली ऑनलाईन ग्रामसभा पुढील आठवड्यात घेण्यात येईल.
-भागवत भुरकाडे,
ग्रामविकास अधिकारी, शिरपूर