---------
दस्तनोंदणीसाठी शेतक-यांची धडपड
वाशिम : आगामी खरीप हंगामासाठी शेतक-यांची लगबग सुरू झाली आहे. त्यात शेती ठोक्याने, मक्त्याने देण्यासह उसनवारीचे व्यवहार शेतकरी करीत आहेत. यासाठी दस्तनोंदणीकरिता दस्तलेखकांकडे गर्दी उसळल्याचे शुक्रवारी दिसले.
----------
पाणंद रस्त्यांच्या कामात खोडा
वाशिम : पालकमंत्री योजनेतून जिल्ह्यातील १४६ पाणंद रस्त्यांच्या कामांना गत महिन्यात मंजुरी मिळाली; परंतु कोरोना संसर्गामुळे या कामांचे अंदाजपत्रक आणि निविदा प्रक्रिया थांबल्याने कामात खोडा निर्माण झाला आहे.
-----------
चेकपोस्टवर २४ तास पहारा
उंबर्डा बाजार : कारंजा तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता तहसीलदारांनी जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट सुरू केले आहे. त्यात कारंजा-दारव्हा मार्गावरील सोमठाणा चेकपोस्टवर कर्मचा-यांचा २४ तास पहारा आहे.
------------------
समृद्ध गाव स्पर्धेची कामे थांबली
उंबर्डा बाजार : परिसरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सहभागी असलेल्या गावांत खबरदारी म्हणून या स्पर्धेची कामे थांबविण्यात आली आहेत. त्याचा परिणाम कामगिरीवर होणार आहे.
-------------------