शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पुस्तकाविनाच विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:46 AM

शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: ...

शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत शासकीय मराठी आणि उर्दू शाळांतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते. साधारणत: शाळेचे सत्र सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी या पाठ़्यपुस्तकांचे वितरण केले जाते. वाशिम जि.प. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत १ लाख २६ हजार ३०१ विद्यार्थ्यांसाठी ७ लाख ५ हजार ५५० पुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. तथापि, शैक्षणिक सत्र सुरू होऊन पंधरवडा उलटला, तरी जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. आता शाळा सुरु होऊन पंधरवडा उलटला, तरी पुस्तकेच मिळाली नसल्याने शिक्षकांनाही ऑनलाइन धडे देताना अडचणी येत आहेत.

----------------------

मुलांनी जुनी पुस्तके परत केली नाही

१) शिक्षण विभागाने गतवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे ठरविले होते. या उपक्रमातून कागदाची बचत होऊन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

२) २०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शिक्षण विभागाने पालक आणि विद्यार्थ्यांना केले होते.

३) अद्याप एकाही विद्यार्थ्याने जुनी पुस्तके शाळेत परत केलेली नाहीत आणि त्यामुळे जुन्या पुस्तकांचे संकलन झाले नाही.

४) आता शाळेतील शिक्षकांनी घरोघरी फिरून पुस्तकांचे संकलन केल्यास अनेक विद्यार्थ्यांना वितरित करता येणार आहेत.

--------------

पुस्तकेच नाहीत अभ्यास कसा करणार?

१) कोट: गेल्या पंधरा दिवसांपासून आम्हाला ऑनलाइन पद्धतीने धडे देण्यात येत आहेत. तथापि, आम्हाला अद्याप पाठ्यपुस्तकेच नसल्याने अभ्यास कसा करावा, असा प्रश्न पडला आहे.

- सचिन इंगोले, विद्यार्थी

----------

२) कोट: ऑनलाइन शिक्षण सुरू झाले, तरी आम्हाला मोफत पाठ्यपुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे अभ्यास करावा कसा, असा प्रश्न पडला आहे. गतवर्षीची जुनी पुस्तकेही शोधली, परंतु मिळाली नाही.

- फरहान परसुवाले, विद्यार्थी

--------

कोट: यंदाच्या शैक्षणिक सत्रात मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेंतर्गत १ लाख २६ हजार विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे, परंतु अद्याप शासनाकडून पुस्तकांचा पुरवठा झाला नाही. विभाग स्तरावरून लवकरच पुस्तके प्राप्त झाल्यानंतर वितरण केले जाणार आहे.

- गजाननराव डाबेराव, प्र.उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. वाशिम

^^^^^^^^^^^

वर्गनिहाय विद्यार्थी संख्या

वर्ग - विद्यार्थी

पहिली - १९,६९०

दुसरी - २०,१९८

तिसरी - १९,६१८

चौथी - २१,१७७

पाचवी - २१,०५२

सहावी - २१,१३६

सातवी -२१,४३६

आठवी -२१,५००