वाशिम : कीडनाशक उर्वरित अंश व कीड रोगमुक्त उत्पादनाची हमी देण्यासाठी ‘अपेडा’ने निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी ग्रेपनेट, मँगोनेट, अनारनेट, सिट्रसनेट व व्हेजनेट या प्रणाली विकसित केल्या आहेत. या अंतर्गत शेतकºयांना मोबाईल अॅपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी शनिवारी दिली.निर्यातक्षम फळे, भाजीपाला विक्रीसाठी शेतकºयांची गैरसोय होऊ नये म्हणून कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. या प्रक्रियेला आॅनलाईनची जोड दिली आहे. निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी शेतकºयांना फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीत स्वत:चे नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड नंबर व ई-मेल आयडी आदी माहिती भरल्यानंतर शेतकºयांना आॅनलाईन पद्धतीने नोंदणी अधिकाºयांकडे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील फलोत्पादन उत्पादक शेतकºयांनी त्यांच्याकडील निर्यातक्षम बागांची नोंदणी फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅपद्वारे करावी, असे आवाहन तोटावार यांनी केले.
निर्यातक्षम फळे, भाजीपाल्यांची ऑनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 5:13 PM
Washim Agriculture News निर्यातक्षम बागांच्या नोंदणीसाठी शेतकºयांना फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.
ठळक मुद्देफार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅप विकसित गैरसोय होऊ नये म्हणून कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.