कोरोनाचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे प्रत्यक्ष शिक्षक-पालक सभेचे आयोजन करणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन झूम ॲपच्या माध्यमातून या सभेचे आयोजन करण्यात आले होते .विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा हेतू केंद्रस्थानी ठेवून चालू शैक्षणिक सत्र २०२१ -२२ चे नियोजन करण्यात आले. शैक्षणिक सत्राची सुरुवात महाराष्ट्र शासनाने ठरविलेल्या (ब्रीज कोर्स) सेतू अभ्यासक्रमाने करण्यात आली. सेतू अभ्यासक्रम हा मागील वर्षाच्या चालू अभ्यासक्रमाशी निगडित आहे. सभेत ऑनलाईन अध्ययनाच्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी, समस्या व शंकेचे निराकरण करण्यात आले. तसेच पालकांकडून अनेक सूचना व शिफारशी मिळाल्यात.
इयत्ता के.जी. टू ते इयत्ता आठवीपर्यंत सभा आयोजित करण्यात आली होती. बऱ्याच पालकांचा सभेला भरघोस प्रतिसाद मिळाला. सभा यशस्वी करण्यामध्ये सर्व शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभले.