फळपिकाची काळजी घेण्याचे आवाहन
वाशिम : सद्य:स्थितीत काही ठिकाणी फळपिकांंवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत काळजी घेऊन परिस्थिती गंभीर असल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गुरुवारी केले.
मजुरांच्या कामाची देयके प्रलंबित
वाशिम : सन २०१९ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत कामाचा शेकडो कामगारांना अद्याप मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना कुशल कामाची देयकेही अद्याप मिळालेली नाहीत. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.
आरोग्य केंद्रात ग्रामस्थांना मार्गदर्शन
वाशिम: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सोमवारी गर्भवती व स्तनदा माता व ग्रामस्थांना फिजिकल डिस्टन्सिंगने आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागात अनियमित वीजपुरवठा
वाशिम : जिल्ह्यातील इतर काही गावांमध्ये आठवडाभरापासून विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे.