जिल्ह्यात एप्रिल २०२०मध्ये कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण आढळला होता. संसर्गाची ही पहिली लाट फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम राहिली. यादरम्यानच्या काळात एकूण ७ हजार ४३० बाधित रुग्ण निष्पन्न झाले. फेब्रुवारी २०२१ नंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने मात्र जिल्हाभरात अक्षरश: हाहाकार माजविला. तीनच महिण्यांत ३३ हजार ७३१ नवे रुग्ण आढळले. विशेष गंभीर बाब म्हणजे मध्यंतरीच्या काळात रुग्ण भरती ठेवण्यासाठीदेखील रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नसल्याचा अनुभव अनेकांनी घेतला. १ जून २०२१ पासून मात्र सातत्याने दिलासा मिळत असून, कोरोनाच्या रुग्णसंख्येत परिणामकारक घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. १७ जून रोजी केवळ २९ नवे रुग्ण निष्पन्न झाले. दरम्यान, फेब्रुवारी ते जून २०२१ या कालावधीत कोरोनाने जिल्ह्याबाहेर झालेल्या आणखी दहा मृत्यूंची नोंद पोर्टलवर घेण्यात आली.
....................
१७ जून रोजी आढळलेले रुग्ण
वाशिम तालुका - ०५
मालेगाव तालुका - ०३
रिसोड तालुका - ०९
मंगरूळपीर तालुका - ०७
कारंजा तालुका - ०१
मानोरा तालुका - निरंक
.....................................
कोरोना बाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह-४११६१
ॲक्टिव्ह-४७१
डिस्चार्ज-४००७७
मृत्यू-६१२