- नंदकिशाेर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पाॅलिटेक्निकसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात केल्या जाते. यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्र गाेळा करण्यासाठी वेळ मिळावा याकरिता आधीच ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला आहे. ३० जूनपासून आजपर्यंत १६ दिवसात १२८ जणांनी अर्ज भरल्याची माहिती वाशिम येथील पाॅलिटेक्निक काॅलेजचे प्राचार्य डाॅ. विजय मानकर यांनी दिली.वाशिम जिल्ह्यात केवळ एकच पाॅलिटेक्निक काॅलेज असून या काॅलेजमध्ये एकूण ६ बॅच असून प्रत्येक बॅचमध्ये ६० असे एकूण ३६० विद्यार्थी क्षमता आहे. विविध अभ्यासक्रमांतर्गंत येथे शिक्षण दिल्या जात असून याकरिता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असला तरी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. १६ जून राेजी दहावीचा निकाल लागला असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेला गती येणार असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी पाॅलिटेक्निकसाठी विदयार्थी माेठ्या प्रमाणात जायचे याचे प्रमाण काही वर्षांपासून कमी झाल्याचे दिसून येत असल्याने दरवर्षी काही ना काही प्रमाणात क्षमतेएवढे विद्यार्थी दिसून येत नाहीत. गतवर्षी २५ टक्के जागा रिक्त राहिल्या हाेत्या.
तंत्रशिक्षणचे संचालक डाॅ. अभय वाघ यांच्या विशेष प्रयत्नाने विद्यार्थ्यांना कागदपत्रे गाेळा करण्यात यावीत यासाठी दहावी निकालाआधीच अर्ज प्रक्रिया सुरू केली. - डॉ. विजय मानकर, प्राचार्य, पाॅलिटेक्निक काॅलेज, वाशिम