संतोष वानखडे / वाशिमसावकारी कर्जमाफीसाठी आलेल्या सुमारे सव्वा तीन हजार प्रस्तावांपैकी केवळ ५४१ अर्ज छानणी त पात्र ठरले. या शेतकर्यांवरील कर्जाचा चुकता करण्यासाठी सहकार विभागाने २४ परवानाधारक सावकारांना ८९.८६ लाख रुपये दिले आहेत. गत तीन वर्षांंपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. संसाराचा घरगाडा चालविणे आणि शेती पिकविणे या दोन उद्देशाने शेतकरी बँका, पतसंस्था, अधिकृत सावकार व अनधिकृत सावकारांच्या दारात उभा राहतो. कर्जासाठी बँकांचे दर कमी आहेत. मात्र, प्रक्रिया किचकट असल्याने आणि सात-आठ चकरा मारल्यानंतरही पदरी निराशाच पडत असल्याने अनेकजण खासगी सावकारांकडे कर्जासाठी धाव घेतात. २0१४ मध्ये जिल्ह्यातील ९१७८ कर्जदार सभासदांनी ४३ परवानाधारक सावकारांकडून १0 कोटी ५0 लाखांचे कर्ज काढले होते. २0१४ मध्ये कोरडा दुष्काळसदृश परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर राज्य शासनाने, शेतकर्यांवरील सावकारी कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. यानुसार, सहकार विभागाने कर्जमाफीचा आदेश काढून ९१७८ पैकी शेतकरी किती याचा शोध घेण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले. जवळपास तीन हजाराच्या आसपास प्रस्ताव प्राप्त झाल्याने प्रथम तालुकास्तरावर आणि नंतर जिल्हास्तरावर समितीतर्फे छानणी करण्यात आली. सुरूवातीला एकाच तालुक्याची असलेली अट नंतर शिथिल झाल्याने प्रस्तावांच्या संख्येतही किंचितशी वाढ झाली. साधारणत: सव्वा तीन हजार प्रस्तावांपैकी कर्जमाफीसाठी ५४१ प्रस्तावाला जिल्हास्तरीने समितीने मान्यता दिली. ५४१ शेतकरी सभासदांनी ७७.६८ लाख रुपयांचे सावकारी कर्ज काढले होते. या कर्जाचे व्याज १२.१८ लाख झाल्याने एकूण सावकारी कर्जाचा आकडा ८९.८६ लाखावर पोचला. यामध्ये कारंजा तालुक्यातील ३८३ शेतकर्यांनी ११ सावकाराकडून घेतलेल्या ५९.२२ लाख रु पयांच्या कर्जाचा समावेश आहे. वाशिम तालुक्यातील सहा शेतकर्यांचे ४२ हजार रुपये कर्ज, रिसोड तालुक्यात ११४ शे तकर्यांचे १५.४९ लाखाचे कर्ज, मानोरा तालुक्यात २६ शेतकर्यांचे १२.७५ लाख रुपयाचे कर्ज, मंगरुळपीर तालुक्यात चार शेतकर्यांचे ९१ हजाराचे कर्ज आिण मालेगाव तालुक्यातील आठ शे तकर्यांकडील १.७ लाख रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे.
सावकारी कर्जातून केवळ ५४१ शेतक-यांची सुटका!
By admin | Published: August 02, 2016 11:57 PM