एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत ७ हजारांवर कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्येचा आलेख वाढत गेला. २८ जून अखेर संसर्गाने बाधित एकूण रुग्णांचा आकडा देखील ४१ हजार ३८८ वर पोहोचला आहे. असे असले तरी १ जूनपासून दुसरी लाट ओसरत चालल्याचे दिसून येत आहे. सध्या २३७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत कोरोना संसर्गाने ६१८ जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, नव्याने आढळलेल्या ८ रुग्णांमध्ये वाशिम तालुक्यातील ४, रिसोड १, मंगरूळपीर १, कारंजा आणि कारंजा तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे ; तर मालेगाव आणि मानोरा या दोन तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाने जिल्ह्याबाहेर झालेल्या एका मृत्यूची पोर्टलवर नोंद घेण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आली.
.................
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१,३८८
ॲक्टिव्ह – २३७
डिस्चार्ज – ४०,५३२
मृत्यू – ६१८