शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

निगेटिव्ह अहवाल असेल तरच जाता येणार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 12:25 PM

Sub-Regional Transport Office : ४८ तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय शासकीय प्रवेश देण्यात येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाशिम येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आता अर्जदाराच्या प्रतिनिधींना प्रवेश नसून, अन्य कामकाजाकरिता कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना ॲंटीजन चाचणी करुन ४८ तासापूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय शासकीय प्रवेश देण्यात येणार नाही.राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजता पासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजता पर्यंत ब्रेक द चैन अंतर्गत सूचना आणि निर्देश जारी केले आहे. त्याच अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथील कार्यालयामध्ये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्यात आले आहेत. अभ्यागतांना तसेच अर्जदारांच्या प्रतिनिधींना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत असून, अन्य कामकाजाकरिता कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांना सकाळी १० ते दुपारी २ वाजता दरम्यान ॲंटीजन चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. कार्यालयीन आवारात विनाकारण प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी.ए. हिरडे यांनी दिला.  अत्यावश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने व वाहन ४.० प्रणालीवर ज्या वाहनाचे फिटनेस मोटार वाहन निरीक्षकाने ॲप्रुव्ह केलेले आहे, अशी प्रलंबित प्रकरणे सोडून नवीन वाहन नोंदणीचे कामकाज बंद राहणार आहे.वाहन हस्तांतरण, कर्ज बोजा नोंद घेणे,कमी करणे आदी प्रकरणी वाहन ४.० प्रणालीवर प्राप्त झालेली व नियमांची पूर्तता करीत असतील अशी सर्व प्रलंबित प्रकरणे पूर्ण करण्यात येतील. नव्याने सदर कामकाजासाठी कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. आवश्यक सेवेसाठी वापरली जाणारी वाहने सोडून इतर वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज करण्यात येणार नाही. वाहन ४.० प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होणारी सर्व परवाना विषयक कामकाज सुरु राहील. शिकावू अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती विषयी कामकाज बंद राहील. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी  नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन हिरडे यांनी केले. 

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस