लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : नजिकची ३३ खेडी जोडलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने रुग्णसेवा वारंवार प्रभावित होत आहे. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने ही समस्या अधिकच जटिल बनली असून आरोग्य विभागाचे मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील ३३ गावांचा समावेश होतो. यायोगे लाखापेक्षा अधिक रुग्णांच्या आरोग्याची जबाबदारी शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला पेलावी लागत असताना पुरेसे मनुष्यबळ देण्याकामी वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. या आरोग्य केंद्रात वर्षाकाठी सुमारे ३०० कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया होतात. शिरपूर येथे पोलिस स्टेशन कार्यान्वित असल्यामुळे याअंतर्गत अपघातात जखमी होणाऱ्या रुग्णांसोबतच विविध घटनांमधील आरोपींचे ह्यमेडिकलह्ण करण्यासाठी आरोग्य केंद्रात नेले जाते; परंतू अपेक्षित मनुष्यबळच नसल्यामुळे एकट्या वैद्यकीय अधिकाऱ्यावरच अतिरिक्त ताण पडत असल्याचे दिसून येत आहे.
३३ गावांमधील रुग्णांसाठी केवळ एक वैद्यकीय अधिकारी!
By admin | Published: July 06, 2017 7:36 PM