जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण एप्रिल २०२० या महिन्यात आढळला होता. फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम राहिलेल्या पहिल्या लाटेत एकूण रुग्णांचा आकडा ७ हजार ४३० वर पोहोचला. त्यानंतर आलेली संसर्गाची दुसरी लाट मात्र तुलनेने अति तीव्र स्वरूपाची ठरली. मे अखेरपर्यंत रुग्णवाढीचा आलेख सतत उंचावत राहिला; तर २४ जूनअखेर एकूण रुग्णांचा आकडा ४१ हजार ३१५ झाला आहे. असे असले तरी १ जूनपासून सातत्याने रुग्णसंख्या कमी होत चालली असून, गुरुवारी करण्यात आलेल्या एकूण १५८० चाचण्यांपैकी केवळ ७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.
.................
दोन तालुके निरंक
कोरोनाविषयक स्थितीसंदर्भात गुरुवारचा दिवस जिल्ह्यासाठी अत्यंत समाधानकारक ठरला. आज रिसोड आणि मानोरा या दोन तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण निष्पन्न झालेला नाही; तर मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा या तीन तालुक्यांमध्ये नव्याने प्रत्येकी केवळ एक रुग्ण आढळला. वाशिम तालुक्यात शहरात तीन व साखरा येथे एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.
.................
कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१३१५
ॲक्टिव्ह – २८४
डिस्चार्ज – ४०४१५
मृत्यू – ६१५