लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदीची तयारी सीसीआयने केली आहे. दिवाळीनंतर या खरेदीला प्रारंभ होणार आहे. तथापि, जिल्ह्यात फेडरेशनचे एक आणि सीसीआयचे दोन मिळून तीनच केंद्र राहणार आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येऊन कापूस खरेदीत गोंधळ उडण्याची भीती आहे. याचा मोठा त्रास जिल्ह्यातील शेतकºयांना होणार आहे.जिल्ह्यात यंदा २९ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली होती. कपाशीची वेचणी सुरू झाली आहे. शासनाने यंदा लांब धाग्याच्या कपाशीला ५८२५ रुपये प्रती क्विंटल हमीदर घोषीत केले आहेत. जिल्ह्यात मात्र व्यापाºयांकडून अधिकाधिक ५ हजार रुपये प्रती क्विंटल आहेत. अर्थात हमीदरापेक्षा ८०० रुपये कमीदराने शेतकºयांना कपाशी विकावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतिक्षा करीत आहेत. सीसीआयने कापूस खरेदीची तयारीही केली असून, दिवाळीनंतर या खरेदीला सुरुवात होणार आहे. तथापि, यंदा जिल्ह्यात मंगरुळपीर आणि वाशिम येथे सीसीआय, तर कारंजा येथे फेडरेशन सीसीआयचे उपअभिकर्ता म्हणून हमीभावाने कापूस खरेदी करणार आहे. अर्थात जिल्ह्यात यंदा तीनच शासकीय कापूस खरेदी केंद्र राहणार असल्याने यंत्रणेवर ताण येणार असून, शेतकºयांना त्याचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदा तीन ठिकाणी शासकीय कापूस खरेदी होणार आहे. त्यासाठी सीसीआय आणि फेडरेशनने नियोजन केले आहे. या खरेदी प्रक्रियेसाठी बाजार समित्यांत नोंदणी करून घेण्याच्या सूचना आहेत.-सुधीर मेत्रेवार, जिल्हा उपनिबंधक