लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: गतवर्षी एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी आर्थिक भरपाई म्हणून शासनाने २ लाख ७९ हजार ५२२ अतिवृष्टी बाधित शेतकºयांना मदत जाहीर केली. यात वाशिम जिल्ह्यातील केवळ २ शेतकºयांचा समावेश आहे. माहे एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होेते. या नुकसानीची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना क्षेत्रिय अधिकाºयांना देण्यात आल्या होत्या. या पंचनाम्यानंतर शासन निकषानुसार राज्यभरातील २ लाख ७९ हजार ५२२ अतिवृष्टी बाधित शेतकºयांना शासनाने आर्थिक मदत म्हणून ११०,०९,००,७५० (एकशे दहा कोटी नऊ लक्ष सातशे पन्नास रुपये) इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील केवळ दोन शेतकºयांचा समावेश आहे. शासनाच्या निकषानुसार जिल्ह्याती केवळ १.६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक मदतीसाठी अमरावती विभागातील १५०८ शेतकरी पात्र ठरले असून, राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हे प्रमाणही सर्वात कमी आहे. वाशिम शिवाय औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद जिल्ह्यातील दोनच शेतकरी पीक नुकसानीच्या मदतीस पात्र ठरले आहेत.
अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी वाशिम जिल्ह्यातील केवळ २ शेतकरी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 2:08 PM
वाशिम: गतवर्षी एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
ठळक मुद्दे शासनाने आर्थिक मदत म्हणून ११०,०९,००,७५० (एकशे दहा कोटी नऊ लक्ष सातशे पन्नास रुपये) इतकी रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील केवळ दोन शेतकºयांचा समावेश आहे.राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हे प्रमाणही सर्वात कमी आहे.