लोकमत न्यूज नेटवर्कदेपुळ : वाशिम तालुक्यातील पिंपळगाव डागबंगला ग्रामपचांयतने गाव हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने केलेल्या विविध उपाय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने सरपंच गिताबाई पंडीत भुसारे तथा सचिव व्ही.डी.पाटील यांनी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेवन गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी हागणदारीत जाणाऱ्या रस्त्यावर खोल अशा नाल्या खोदुन हागणदारीचे रस्ते बंद केले आहेत. ही आगळ ी वेगळी उपाय योजना केल्यामुळे वैयक्तीक शौचालय बांधकामास गती मिळत आहे.जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील, तथा वाशिम पं.स.चे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम तालुका हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला. त्या दृष्टीने पिंपळगाव डागबंगला ग्रामपंचायतने मासीक सभा ग्रामसभा तथा विशेष वार्ड निहाय सभा घेवुन संपूर्ण स्वच्छता अभियान तथा हागणदारी मुक्त गाव याबाबत ग्रामस्थांना सरपंच गिताबाई पंडीत भुसारे तथा सचिव व्ही.डी.पाटील, यांनी जनजागृती केली. तरीही पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतने तथा गुड मॉर्निंग पथकाने प्रत्येकी १ हजार २०० रुपयाचा दंड केला. एवढेच नव्हे तर अनेकांवर पोलिसात कार्यवाही केली , परंतु फारसा परिणाम दिसत नाही. म्हणून ग्रामपंचायतने एक आगळी वेगळी उपाय योजना करुन हागणदारीत जाणारे रस्ते खोल नाल्या खोदुन बंद केले.त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाराची रस्ता बंद झाल्याने त्यांची पंचायत झाली.त्यामुळे वैयक्तीक शौचालय बांधकामात वाढ होत आहे. या उपाय योजनेमुळे ग्रामपंचायतने संकल्प केलयाप्रमाणे १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत पिंपळगाव हागणदारीमुक्त होण्यास मदत होणार आहे.