‘त्या’ पुलामुळे अपघाताची भीती
वाशिम : पैनगंगा नदीपात्रात पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाची उंची कमी असून, पाऊस आला की, पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा
वाशिम : कामरगाव परिसरात गतवर्षी जून, जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले हाेते. झालेल्या पीक नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षा येथील शेतकऱ्यांना आहे.
जिल्ह्यातील लघू प्रकल्प तहानलेलेच
वाशिम : यंदा वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. तथापि, सार्वत्रिक पावसाचा अभाव आणि दीर्घ खंडामुळे या तालुक्यातील प्रकल्प तहानलेलाच आहे.
सुरक्षित फवारणी करण्याचे आवाहन
वाशिम : सोयाबीनवर कीटक नाशकांची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. फवारणी किट आणि पायात लांब बूट घालूनच फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले.