तऱ्हाळा येथील पीडित ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ती पती, मुलगा व दोन मुलींसह राहत असून, घरकाम करते. तिच्या घराला लागूनच भासरे राहतात. अंदाजे दोन वर्षांपासून पती नेहमी मारहाण करतो तसेच इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार करतो. भासरेदेखील पती घरी नसताना दारू पिऊन घरी येतात आणि शिवीगाळ करून शारीरिक सुखाची मागणी करतात. २१ जुलै रोजी घरी कुणी नसताना पतीने शारीरिक अत्याचार केला. पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर जीवे मारून टाकील अशी धमकी दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मंगरूळपीर पोलिसांनी दाेन्ही आरोपींवर भादंवि कलम ३७७, ५०९, ३५४ ड, ३२३, ५०६, २९४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
००००
आरोपीला अटक
या प्रकरणाचा तपास मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे डीबी पथक करीत आहे. डीबी पथकाचे नापोकॉ अमोल मुंदे व महम्मद परसूवाले यांनी आरोपींना अटक केली असून, अधिक तपास पीएसआय सुषमा परांडे करीत आहेत.