वाशिम: राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) साधारण बसगाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत असून, प्रवासी खासगी वाहतुकीचा आधार घेत आहेत. सध्या हंगामाचे दिवस असल्याने बस बंद पडल्यास साधी पर्यायी बस उपलब्ध होणे कठीण असते. याचा फटका एसटीला बसू शकतो़ ही बाब लक्षात घेऊन, मार्गात विविध कारणामुळे बंद पडलेल्या बसगाड्यातील प्रवाशांना नियोजित प्रवासासाठी उच्च श्रेणी बसचा पर्याय कोणतेही जादाभाडे न आकारता अनुदेय करण्याच्या सुचना महामंडळाने ११ सप्टेंबरच्या परिपत्रकान्वये सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरात १८६१० विविध फेऱ्या धावतात. यातील बहुतांश बसफेºया विविध कारणांमुळे बंद पडतात. अशावेळी प्रवाशांना विनाकारण खोळंबा होऊन त्रास सहन करावा लागतो. पयार्र्यी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची अवस्था क्रोधाची आणि अगतिकतेची होते. असे प्रकार वांरवार घडत असल्याने प्रवासी खासगी वाहतुकीचा आधार घेत आहेत. अशा परिस्थितीत महामंडळाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या आहेत . तथापि, अशावेळी साधी बस न उपलब्ध झाल्यास मार्गावर धावणाºया उच्च श्रेणी बसमध्ये प्रवासी चढविले जातात. तथापि, प्रवाशांकडून फरकाची रक्कम वसुल केली जाते. आता मार्गावर बस बंद पडल्यानंतर त्यामधील प्रवाशांना उच्च श्रेणी बसमध्ये कोणतेही किंवा फरकाचे भाडे वसुल न करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
मार्गात बंद पडलेल्या साध्या बसला उच्च श्रेणी बसचा पर्याय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 2:13 PM